श्री सिद्धिविनायक मयुरेश्वर मंदिर संस्थान

आपले स्वागत करित आहे

मोरया

प.पू.गणेश योगिनी सौ संध्याताई अमृते ह्यांच्या ध्यासातून आणि परमोच्च भक्तीतून साकारलेली एक प्रसादिक वास्तु म्हणजे श्रीसिद्धिविनायक मयुरेश्वर मंदीर.

हे मंदीर उभारण्याची संकल्पना प.पू.सौ संध्याताई यांचे पिताश्री थोर गाणपत्य श्री महादेव श्रीखंडे ह्यांच्या कडून मिळाली .

गाणपत्य संप्रदायाचा (गणेश भक्तांचा) वटवृक्ष विशाल व्हावा यासाठी प.पूजनीय सद्‌गुरु सौ संध्याताई अनेक वर्षे गणेश भक्तीचा प्रसार आणि प्रचार करत आहेत.

श्री बाप्पाच्या व सदगुरून् च्या आशीर्वादाने मयुरेश्वर सेवा मंडळ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ची स्थापना 23 जानेवारी 1996 साली झाली.ट्रस्ट च्या माध्यमातून आध्यत्मिक आणि सामाजिक प्रकल्प राबवले जातात.आजपर्यंत अनेक किडनी पेशंट, गरजू विध्यार्थी, मतिमंद मुलांच्या संस्था, तसेच नैसर्गिक आपत्ती आणि मनुष्यनिर्मित आपत्तीत आपातग्रस्त जनतेला भरीव मदत केली गेली आहे.



आमचे प्रेरणास्थान

गणेशयोगिनी प. पू. सद्‌गुरु सौ संध्याताई अमृते

विशेष भेट

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांनी आज भोपर येथे मयुरेश्वर बाप्पा आणि गणेश्योगिनी प. पू. सद्गुरू सौ. संध्याताई अमृते यांचे सपत्नीक दर्शन घेतले. त्याची ही काही क्षणचित्रे.

आगामी कार्यक्रम