मयुरेश्वर मंदिर संस्थान

कठोर तपाचरणाच्या संपन्न भूमीवर उभे राहिलेले, उपासनेच्या तक्तपोशीवर रचलेले मोरयाचे हे मंदिर आहे. येथे साधनेच्या सुवर्णकलशावर भक्तिमार्गाची भगवी पताका अखंड फडकत आहे. साक्षात मोरगावचा बाप्पा या मंदिरात स्थित आहे. गणेश गायत्री आणि गणेश दत्त यांच्या दुर्मिळ मूर्ती या मंदिरात आहेत आणि याशिवाय नवग्रह, अन्नपूर्णा देवी, नाग नागीण यांची स्वतंत्र मंदिरे असून त्यांचे रोज पूजन होते. श्री गणेशांचे गर्भागार मेरुदंडाधिष्ठित आहे. असे जगातील दुर्मिळ गोष्टी आणि वैशिठ्यांनी हे मंदिर संपन्न आहे. वास्तु देवतेबरोबरच हजारोंनी लिखित जप मंदिराच्या पायामध्ये रचला गेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे साक्षात सद्गुरूंचे येथे कायम वास्तव्य आहे.

गणेश योगिनी प. पू. सद्गुरु सौ. संध्याताई अमृते यांच्या अखंड साधनेतून मंदिरात सतत धार्मिक पारायणे, यज्ञयाग, पूजा, अनुष्ठाने, अध्यात्मिक शिबिरे, चक्री पारायण, सद्गुरूंची प्रवचने असे अनेक उपक्रम सुरु असून त्यातून हजारो भक्तांचे हे मंदिर श्रद्धास्थान बनले आहे.


मंदिर उभारणीतील ठळक टप्पे


४ मे २००१ - मंदिर आणि अंगीरस आश्रमाचे भूमिपूजन व शिलान्यास समारंभ माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते पार पडला

११ मे २००५ - आदरणीय श्री गणेश महाराज (केम्पवाड )यांच्या शुभहस्ते अक्षयतृतीयेच्या शुभ दिनी मंदिर कलश स्थापना आणि प्रतिष्ठापना सोहळा पार पडला

३० एप्रिल २००६ - गणेश योगिनी प. पू. सद्गुरु सौ. संध्याताई अमृते व माननीय श्री. दिलीप अमृते यांच्या हस्ते परिवार देवता व कळस स्थापना

४ ऑगस्ट २०२१ - गणेश योगिनी प. पू. सद्गुरु सौ. संध्याताई अमृते व माननीय श्री. दिलीप अमृते यांच्या हस्ते परिवार देवता पुनर्प्रतिष्ठापना सोहळा

  • ४ मे २००१
  • ११ मे २००५
  • ३० एप्रिल २००६
  • ४ ऑगस्ट २०२१