भोपर येथील मयुरेश्वर मंदिराचे प्रेरणास्थान! नामस्मरणाचा गाभा आणि कर्माधीष्टीत उपासनेचा पाया रचून प्रपंचातून परमार्थाची वाटचाल करता करता प. पू. ताईंनी श्री गणेशाचे भव्य मंदिर उभारले. आज हजारो भक्तांचे ते जागृत श्रद्धास्थान आहे.
स्वतः सद्गुरु उच्चशिक्षित आहेत. मुंबईत विल्सन कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांनी एम. ए. बी. एड. या पदव्या मिळवल्या, नवनाथ संप्रदायाचा विशेष अभ्यास केला.
संसार-नोकरी-ट्युशन क्लासेस असा प्रपंच सांभाळताना श्री गणेश उपासनेतून आध्यात्मिक प्रवास करीत सद्गुरु पदापर्यंतचा अलौकिक टप्पा गाठला. हा प्रवास करता करता त्यांनी विविध प्रकारचे आध्यात्मिक कार्य केले आणि अजूनही करीत आहेत. सगुणातील ईश्वर पूजन करण्यासाठी सातत्याने सामाजिक बांधिलकी सांभाळली. मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर गरजूंपर्यंत त्या पोहोचल्या, जांभूळपाड्याला पूर आला तेव्हा अनेकांना आईच्या मायेने मदत पोहोचवली, किडनी पेशंट्स ना आर्थिक मदत आणि मानसिक आधार दिला.
कार्यकर्ता शिबिरे, लहान मुलांसाठी संस्कार शिबिरे असे अनेकानेक कार्यक्रम राबविले. त्यातून शेकडो कार्यकर्ते घडवले. सर्वांमध्ये संस्काराची रुजवण करून त्यातून आदर्श समाज त्या घडवीत आहेत.