हा दिवस म्हणजेच गणेश जयंती. ह्या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. पुढचा दिवस म्हणजे वसंत पंचमी. माघी चतुर्थीला केलेला उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे वसंत पंचमीला सोडतात. आपल्या मंदिरात ह्या दोन दिवशी खूप मोठा उत्सव असतो. चतुर्थी आणि पंचमी ह्या दोन्ही दिवशी विशेषत्वाने हजारो दिवे लावून दीपोत्सव साजरा होतो.
धुलीवंदन अर्थात फाल्गुन पौर्णिमा. ह्याच शुभ दिनी आपल्या बाप्पाच्या मूर्तीचे मंदिरात 2005 साली आगमन झाले होते म्हणून हा दिवस बाप्पाचा आगमन दिन म्हणून साजरा होतो. ह्या दिवशी मंदिरात विशेष उत्सव असतो.
तारखेप्रमाणे हा आपल्या सद्गुरु प. पू. सौ. संध्याताई यांचा जन्मदिवस. त्यादिवशी सद्गुरुंना अभिष्टचिंतन देण्यासाठी सगळे शिष्य जमतात आणि एक मोठा सोहळा साजरा होतो.
गुरूंप्रती आपली श्रद्धा, निष्ठा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. संपूर्ण जगभरातून सद्गुरु सौ. ताईंचे सर्व शिष्य ह्यादिवशी एकत्र येतात आणि आपली कृतज्ञता व्यक्त करतात.
अर्थात भाद्रपद चतुर्थी. घरोघरी बाप्पाचे आगमन होते आणि सर्वांच्या आनंदाला आणि उत्साहाला उधाण येते तोच हा दिवस. पुढचा दिवस तितकाच महत्वाचा म्हणजेच ऋषी पंचमीचा. हे दोन दिवस मंदिरात मोठा उत्सव साजरा होतो.
आदिशक्तीच्या अनेक रुपांपैकी एक असलेल्या गायत्री देवीचा हा उत्सव. आपल्या मंदिरात विशेषत्वाने असलेल्या "गणेश गायत्री" मातेचा ९ दिवस दर्शन सोहळा असतो. हे ९ दिवस सर्व भाविकांना गायत्री मातेचे स्पर्श दर्शन घेण्याची संधी मिळते.
मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्त जयंतीचा दिवस. आदिगुरू, श्री गुरुदेव दत्त यांच्या जयंतीच्या निमित्ताने मंदिरात विशेषत्वाने असलेल्या "गणेश दत्त" ह्या देवतेचा मोठा उत्सव होतो. या दिवशी भाविकांना देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते.
प्रत्येक महिन्यात कृष्ण चतुर्थी अर्थात संकष्टी चतुर्थी आणि शुद्ध चतुर्थी अर्थात विनायकी चतुर्थी ह्या दिवशी बाप्पाची विशेष पूजा आणि सद्गुरु सौ. संध्याताई अमृते ह्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळते.
याचबरोबर वर्षभरात अनेक अध्यात्मिक आणि धार्मिक दिवस जसे गुढी पाडवा, दसरा, त्रिपुरी पौर्णिमा, अक्षय तृतीया इत्यादी दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम तसेच सद्गुरुंचे प्रत्यक्ष दर्शन सर्व भाविकांसाठी खुले असते.